झारखंडमध्ये मोठा विमान अपघात, रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स कोसळली; 7 जाणांचा मृत्यू
Air Ambulance Accident : सात जणांना रांचीहून दिल्लाला घेऊन जाणारी एअर अँब्युलन्स झारखंडमधील चतरा येथे कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे.
Air Ambulance Accident : सात जणांना रांचीहून दिल्लाला घेऊन जाणारी एअर अँब्युलन्स झारखंडमधील चतरा येथे कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही एअर अँब्युलन्स रांचीहून दिल्ला जाण्यासाठी दुपारी 1.37 निघाली होती आणि 4.30 दिल्ली पोहोचणार होती मात्र अचानक एअर अँब्युलन्स चतरा येथे कोसळल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय संजय कुमार असे या रुग्णाचे नाव असून तो भाजला होता.
तर दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच (Air Ambulance Accident) , चतरा जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राज्य सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तयारी करत आहेत.
चतरा पोलिस अधीक्षक सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. ही घटना घनदाट जंगलात असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे पोहोचणे कठीण झाले आहे. हे एका गंभीर आजारी रुग्णाला दिल्लीला घेऊन जाणारे वैद्यकीय विमान होते. विमानात एकूण सात लोक होते: एक रुग्ण, एक डॉक्टर आणि एक पॅरामेडिक, दोन अटेंडंट (रुग्णाचे कुटुंबीय), एक मेन पायलट (पीआयसी) आणि एक सह-पायलट.
वृत्तांनुसार, रांची (Ranchi) दिल्ली (Delhi) सेक्टरमध्ये वैद्यकीय निर्वासन (एअर अँब्युलन्स ) साठी कार्यरत असलेले रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट सी90 विमान (Beechcraft C90 aircraft) व्हीटी-एजेव्ही झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कासरिया पंचायत येथे कोसळले. विमानात दोन क्रू सदस्यांसह सात लोक होते.
रांची से दिल्ली आ रही एयर एंबुलेंस क्रैश, झारखंड में गिरा विमान, मरीज को दिल्ली लाया जा रहा था. विमान में 7 लोग सवार थे. pic.twitter.com/fgrxpXHIVA
— Versha Singh (@Vershasingh26) February 23, 2026
मेषसह ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा अन्…, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
उच्चस्तरीय चौकशीची होणार?
झारखंड सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी तांत्रिक चौकशी केली जाईल. सध्या, प्रशासनाचे प्राधान्य मदत आणि बचाव कार्य आहे.
