Dhamaal 4 ची बॉक्स ऑफिसवर धूम! दुसऱ्या दिवशी 50% वाढ, दोन दिवसांत 38.81 कोटींची कमाई

Dhamaal 4 -चित्रपटाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Written By: Published:
Dhamal 4

Dhamaal 4 : इंद्र कुमार दिग्दर्शित ‘धमाल 4′(Dhamaal 4) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. पहिल्याच दिवशी 15.50 कोटी रुपयांची नेट कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल 50 टक्क्यांची वाढ नोंदवत 23.31 कोटी रुपयांचा नेट गल्ला जमवला. यासह दोन दिवसांत ‘धमाल 4’ची भारतातील एकूण नेट कमाई 38.81 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘धमाल’ फ्रँचायझीने यावेळीही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यश मिळवले आहे. विनोदी प्रसंग, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि भावनिक क्लायमॅक्स यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना, विशेषतः कुटुंबीयांना, आवडत आहे. शहरांसह ग्रामीण भागातील सिनेमागृहांमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, तो या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक पसंतीचा मनोरंजनपट ठरत आहे.

‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिस कमाई
शुक्रवार: ₹15.50 कोटी (नेट)
शनिवार: ₹23.31 कोटी (नेट)
एकूण भारतातील नेट कमाई: ₹38.81 कोटी

‘धमाल 4’ हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत असून देवगण फिल्म्सच्या सहकार्याने प्रदर्शित करण्यात आला आहे. टी-सीरिज फिल्म्स, मरुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. तर अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या ‘धमाल 4’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत आहे.

follow us