मोठी बातमी ! पार्थ पवार, रामदास आठवले अन् धैर्यशील पाटील राज्यसभेवर जाणार
Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील
Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील असल्याने या जागांवर कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आले आहे. आज रात्री 10 वाजता राज्यसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपा कोर कमिटीची मुख्यमंत्री वर्षा निवास्थानी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत भाजपच्या उमेदवारांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना देखील महायुतीकडून (Mahayuti) पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबत पुढील काही क्षणात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.
तर उरलेल्या जागांसाठी भाजपकडुन विजया रहाटकर, भागवत कराड, विनोद तावडे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या नावांची चर्चा आहे. संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागांवर महायुती बाजी मारणार आहे. यामध्ये भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एक- एक जागा मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत सध्या अनेक दावे करण्यात येत आहे.
शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा राज्यसभेत कार्यकाळ संपल्याने राज्यसभेच्या 7 जागांवर निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
वेस्ट इंडिजने दिला भारताला धक्का; आता सेमीफायनल अवघड ? जाणून घ्या समीकरण
राज्यसभा निवडणूक 2026 कार्यक्रम
सूचना जारी: 26 फेब्रुवारी 2026
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 5 मार्च 2026
अर्जांची छाननी: 6 मार्च 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 9 मार्च 2026
मतदान: 16 मार्च 2026 (सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00)
मतमोजणी: 16 मार्च 2026, सायंकाळी 5.00
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 20 मार्च 2026
