वेस्ट इंडिजने दिला भारताला धक्का; आता सेमीफायनल अवघड ? जाणून घ्या समीकरण
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला आहे.
T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यानंतर भारतासाठी सेमीफायनल आता अवघड होताना दिसत आहे. वेस्ट इंडिजने सुपर 8 मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात झिम्बब्वेविरुद्ध 107 धावांनी विजय मिळवल्याने त्यांचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त झाला आहे. 23 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला होता.
तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या (West Indies) विजयानंतर देखील भारत अजूनही सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. भारताला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी आता तीन समीकरण आहे. पहिल्या दोन समीकरणामध्ये रन रेट महत्त्वाचा नाही पण एका समीकरणामध्ये रन रेट महत्त्वाची भूमिका बाजवणार आहे.
समीकरण -1
भारत अजूनही सेमीफायनलमध्ये स्वतःच्या बळावर पोहोचू शकते मात्र यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेची (South Africa) मदत आवश्यक असेल. जर दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते सहा गुणांसह सुपर 8 फेज पूर्ण करेल. दरम्यान, जर भारत आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते चार गुणांपर्यंत पोहोचेल. या परिस्थितीत, नेट रन रेट फरक पडणार नाही. दक्षिण आफ्रिका सहा गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल आणि भारत चार गुणांसह.
West Indies get their Super 8 campaign off to a flyer with a statement win over Zimbabwe 💪
Read more on the day’s play 👉 https://t.co/spMg2QjQjq pic.twitter.com/PmELT7uWY2
— ICC (@ICC) February 23, 2026
समीकरण – 2
जर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजकडून हरला आणि झिम्बाब्वेला हरवले आणि भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवले तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताचे प्रत्येकी 4 गुण असतील. या परिस्थितीत, भारताला स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगल्या नेट रन रेटची आवश्यकता असेल.
समीकरण -3
जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध सुपर 8 सामने गमावले तर दक्षिण आफ्रिका 2 गुणांवर असणार. या परिस्थितीत, जर टीम इंडियाने त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकले तर भारत आणि वेस्ट इंडिज प्रत्येकी 4 गुणांसह सेमीफायनलमध्ये पात्र ठरतील. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये प्रत्येकी 2 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहतील.
