अजब मंत्री, गजब कारभार! तब्बल 20 महिने सांभाळलं ‘अस्तित्वात नसलेलं खातं’

Kuldeep Singh Dhaliwal Ran Non Existent Department : पंजाबमध्ये (Panjab) एका मंत्री महोदयाने चक्क ‘अस्तित्वात नसलेलाच’ विभाग चालवल्याचं समोर आलंय. पंजाबमध्ये सध्या ‘आप’चं (AAP) सरकार आहे. प्रशासकीय सुधारणा विभाग, असं या तथाकथित विभागाचं नाव आहे. यावरून भाजपने (BJP) आपला चांगलंच धारेवर धरलंय. प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा तथाकथित प्रशासकीय सुधारणा विभाग रद्द केला करण्यात आलाय.
पंजाबच्या आप सरकारने स्वतःसाठी एक नवीन समस्या निर्माण केलीय. हे प्रकरण एनआरआय व्यवहार मंत्री कुलदीप सिंह धालीवाल (Kuldeep Singh Dhaliwal) यांच्याशी संबंधित आहे. ते जवळजवळ 20 महिने अशा खात्याचे नेतृत्व करत होते, जे फक्त कागदावरच होते. शुक्रवारी मुख्य सचिवांनी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेत ही वस्तुस्थिती समोर आलीय.यामध्ये धालीवाल यांना देण्यात आलेला प्रशासकीय सुधारणा विभाग अस्तित्वातच नसल्याचं म्हटलंय.
विमानात तुटलेली खुर्ची…केंद्रीय मंत्र्यांचा एअर इंडियावर संताप, कॉंग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना घेरलं
आता धालीवाल फक्त एनआरआय व्यवहार विभागाचा कार्यभार सांभाळतील. अधिसूचनेत म्हटलंय की, मंत्र्यांमध्ये विभाग वाटप करण्याबाबतच्या मागील पंजाब सरकारच्या अधिसूचनेत अंशतः बदल करून, धालीवाल यांना पूर्वी वाटप केलेला प्रशासकीय सुधारणा विभाग आजपर्यंत अस्तित्वात नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशानुसार धालीवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय 7 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल, असं देखील अधिसूचनेत म्हटलंय.
यापूर्वी धालीवाल यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खाते होते. मे 2023 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना प्रशासकीय सुधारणा विभाग देण्यात आला. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या आणखी एका मंत्रिमंडळ फेरबदलात, धालीवाल यांना अस्तित्वात नसलेले खाते देण्यात आले होते. विरोधी पक्ष भाजपने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारवर टीका केली. या निर्णयाला त्यांनी ‘केजरीवाल मॉडेल’ असं म्हटलंय.
सोशल मीडियावर NO अश्लील कटेंट! इन्फ्लुएंर्सना मोठा झटका, सरकार करतंय जोरदार तयारी
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, आपने पंजाबमधील कारभाराला विनोद बनवलंय. आपच्या एका मंत्र्याने 20 महिने असा विभाग चालवला, जो कधीच अस्तित्वात नव्हता. 20 महिने मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहित नव्हते की, एक मंत्री ‘अस्तित्वात नसलेला विभाग’ चालवत आहे. पंजाब सरकारला जर त्यांच्या एका प्रमुख मंत्र्यांना सोपवलेले खाते प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात नव्हते, हे समजण्यासाठी जवळजवळ 20 महिने लागले तर तुम्ही कल्पना करू शकता.