…म्हणून भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी; अमेरिकेने सांगितले धक्कादायक कारण
Press Secretary Caroline Levitt : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये तेल पुरवठा
Press Secretary Caroline Levitt : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने भारताला देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने 30 दिवसांसाठी भारताला पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी का देण्यात आली ? याबाबत अमेरिकी सरकराकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय लोक चांगले आहेत. त्यांनी यापूर्वी रशियन तेल (Russian Oil) खरेदी न करण्याच्या अमेरिकेच्या अटी मान्य केल्या होत्या, म्हणूनच अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली असल्याची माहिती व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी बोलताना, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट (Caroline Levitt) म्हणाल्या की, आम्ही हा निर्णय घेतला कारण भारतातील आमचे भागीदार चांगले भागीदार आहेत आणि त्यांनी आधीच रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे, ज्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणून, इराणमुळे जागतिक तेल पुरवठ्यात झालेल्या या तात्पुरत्या कमतरतेला तोंड देण्यासाठी आम्ही काम करत असताना, आम्ही भारताला रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच अमेरिकेने हा निर्णय मंजूर केला कारण भारतासाठी नियत रशियन तेल आधीच समुद्री मार्गाने होते आणि त्यामुळे रशियाला कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही असं पत्रकारांशी बोलताना, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या.
व्हाइट हाउस प्रवक्ता ने एक सवाल के जवाब में कहा
“भारत में हमारे सहयोगी अच्छे लोग रहे हैं और उन्होंने पहले भी रूस से बैन किया हुआ तेल खरीदना बंद कर दिया है…हमने उन्हें कुछ समय के लिए वह रूसी तेल लेने की इजाज़त दी है”
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) March 10, 2026
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट (Scott Bessant) यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान जागतिक ऊर्जा पुरवठा कमी करण्यासाठी, भारताला समुद्री मार्गांवर आधीच असलेल्या जहाजांवर लोड केलेले रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटने मान्यता दिली.
इस्रायली पॉवर प्लांटवर हल्ला करणार; इराणने केली सर्वात मोठी घोषणा
अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी काय म्हणाले?
एका मुलाखतीत स्कॉट बेसंट यांनी भारताचे वर्णन अमेरिकेसाठी एक चांगला भागीदार म्हणून केले. ते म्हणाले, जगात तेलाचा पुरवठा भरपूर आहे. काल, ट्रेझरी डिपार्टमेंटने भारतातील आमच्या भागीदारांना समुद्री मार्गावर आधीच असलेले रशियन तेल खरेदी करण्यास संमती दिली. भारतीय खूप सहकार्य करत आहेत. आम्ही त्यांना बंदी घातलेले रशियन तेल खरेदी करणे थांबवण्यास सांगितले आणि त्यांनी तसे केले. ते अमेरिकन तेलाने बदलणार होते, परंतु तात्पुरती जागतिक तेलाची कमतरता दूर करण्यासाठी, आम्ही त्यांना रशियन तेल स्वीकारण्यास सांगितले. आम्ही परवानगी दिली आहे. आम्ही इतर प्रकारच्या रशियन तेलावरील निर्बंध देखील उठवू शकतो.
