भारत अमेरिकेच्या टार्गेटवर! रशियन तेलावरून तणाव शिगेला, ट्रंपचा थेट इशारा…

भारत अमेरिकेच्या टार्गेटवर! रशियन तेलावरून तणाव शिगेला, ट्रंपचा थेट इशारा…

Trump Warning to PM Modi On Russian oil : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारतावर टीकास्त्र सोडले आहे. रशियन तेल (Russian oil) खरेदी केल्याप्रकरणी भारतावर सुरुवातीचे निर्बंध लादल्याची घोषणा ट्रंप यांनी केली असून, आगामी काळात आणखी कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. त्यांच्या मते, या पावलामुळे रशियाला (India VS America) आधीच शेकडो अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

ही भूमिका ट्रंप यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पोलंडचे राष्ट्राध्यक्ष करोल नवरोकी यांच्यासोबतच्या बैठकीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केली. पोलिश पत्रकाराने रशियाविरोधात ठोस कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारल्यावर ट्रंप नाराज झाले.

मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! जीएसटी कपातीमुळे अनेक वस्तू होणार स्वस्त, संपूर्ण यादी समोर…

भारतावर निर्बंध म्हणजे मास्कोवर प्रहार

ट्रंप म्हणाले की, भारत हा चीननंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. मी भारतावर द्वितीयक निर्बंध लादलेत आणि त्यामुळे रशियाला प्रचंड तोटा झाला आहे. अजून मी ‘फेज-2’ आणि ‘फेज-3’ सुरूही केलेले नाहीत. तुम्ही म्हणता कारवाई नाही झाली, तर मग तुम्हाला नवी नोकरी शोधावी लागेल. भारताला याबाबत दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता, भारत तेल खरेदी करेल तर त्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, आणि तेच झाले.

पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट

भारतावर 50% टॅरिफचा फटका

ट्रंप प्रशासनाने 27 ऑगस्टपासून भारतावर मोठे टॅरिफ लावले आहे. आयातीवरील मूळ 25% कराशिवाय रशियन तेल खरेदीवर आणखी 25% अधिभार लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतावर एकूण टॅरिफचा बोजा 50% वर पोहोचला आहे. त्याउलट चीनवरील अतिरिक्त टॅरिफ मात्र नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे.

मोदींची ठाम भूमिका

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, शेतकरी, पशुपालक आणि लघुउद्योगांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही. आमच्यावर दबाव आणला जाईल, पण आम्ही सहन करू. भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. भारताने अमेरिकेचे टॅरिफ अन्यायकारक असल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube