पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट

पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट

Heavy Rain In Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर (Heavy Rain) काही भागांत थोडा विराम मिळाला होता. मात्र, भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा (Maharashtra Weather Update) इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परत जोर धरण्याची चिन्हे (Rain Update) आहेत. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून, काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बुधवारी ‘या’ राशींवर धनवृष्टी, नशिबाची साथ मिळणार; सविस्तर घ्या जाणून…

मुंबई आणि उपनगरात काय अंदाज?

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आजचा अंदाज : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
उद्यापासून : मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्य व देशातील इतर भागातील परिस्थिती

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर सततच्या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जायकवाडी धरणातील परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे असलेल्या जायकवाडी धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे.धरणाचा साठा सध्या 99 टक्क्यांवर पोहोचला आहे.यावर्षी आतापर्यंत तीन वेळा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.पावसाळा संपण्यापूर्वीच 100 टीएमसी क्षमतेपैकी तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.नांदेड परिसरात दोनदा गोदावरी नदीला पूरस्थिती आली होती.

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

जायकवाडी धरणातील भरपूर पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची आणि औद्योगिक वापराची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. मात्र मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास काही भागात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube