Mumbai Rain : मिठी नदी मुंबईकरांना दरवेळी का घाबरवते? घोटाळा अन् विनाशाचा इतिहास काय?

Mumbai Mithi River Flood Alert : मुंबईत (Mumbai) दरवर्षी पावसाळा आला की नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल सेवा ठप्प होणे हे नेहमीचे चित्र असते. यामध्येच एक नदी दरवर्षी मुंबईकरांना धडकी भरवते, ती म्हणजे मीठी नदी (Mithi River). नाव गोड असलं तरी या नदीने अनेकदा जीवघेणं रूप धारण केलं आहे. सध्या पुन्हा एकदा तिचा जलस्तर वाढत असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत मीठी नदीचा जलस्तर वाढला, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
मुंबईतील मीठी नदीचा पाणीपातळी 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला क्रांती नगर परिसरातून तब्बल 350 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. दरम्यान, कुर्ला, सायन आणि चुना भट्टी स्थानकाजवळ पाणी शिरल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर समुद्र येतो. मात्र, या शहरात एक नदीदेखील आहे…मीठी नदी. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक तिला केवळ नाला समजत होते. नावानेही फार कमी जण परिचित होते. पण 26 जुलै 2005 रोजी झालेल्या विक्राळ पुरानंतर ही नदी संपूर्ण मुंबईकरांच्या लक्षात राहिली.
2005 चा पूर अन् मीठी नदीचा तांडव
मीठी नदी अंदाजे 18 किमी लांब असून पवई तलावापासून माहिम खाडीपर्यंत जाते. 26 जुलै 2005 रोजी विक्रमी 944 मिमी पावसात या नदीने रौद्र रूप धारण केलं. अनेक भागात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं. त्या दिवसानंतर प्रत्येक पावसाळ्यात या नदीचा जलस्तर वाढला की मुंबईकरांना 2005 ची आठवण येते.
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मीठी नदीवरून 65 कोटींचा घोटाळा
पुराचं मुख्य कारण म्हणून नदीत साचणाऱ्या गाळ आणि कचऱ्याला जबाबदार धरलं गेलं. त्यामुळे बीएमसीने गाळ काढण्यासाठी प्रकल्प हाती घेतला. पण या प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे उघडकीस आलं. कागदोपत्री कामं दाखवून कोट्यवधींचा हिशोब उडवला गेला. तब्बल 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसीचे अधिकारी, प्रायव्हेट कंपन्या आणि मध्यस्थ सामील होते. 13 जणांवर एफआयआर दाखल झाली. या घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलिसांच्या EOW कडून करण्यात आली. पुढे ईडीने देखील या प्रकरणात चौकशी सुरू केली.
डिनो मोरियाचं नाव समोर
या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया यांचं नावदेखील समोर आलं. त्यांच्याशी तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. मध्यस्थांकडून मिळालेल्या काही कागदपत्रांत त्यांचं आणि त्यांच्या भावाच्या कंपनीचं नाव असल्याचं समोर आलं.
‘WAR 2’चा जलवा! फक्त 5 दिवसांत 300 कोटींचा टप्पा गाठला
नदीचं नाव ‘मीठी’ कसं पडलं?
मुंबईभोवती समुद्र असून त्याचं पाणी खारं आहे. पण या शहरात वाहणाऱ्या या नदीचं पाणी मात्र गोड (ताजं) आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी तिला प्रेमाने मीठी नदी असं नाव दिलं. कालांतराने हेच नाव प्रचलित झालं.