अतिवृष्टीग्रस्तांना 1278 अनुदान वितरीत; आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी दिली माहिती
MLA Ranajagjitsinh Patil यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनुदानापोटी ₹ 1278 कोटी दिवाळीपासून आजवर खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे सांगितले.
1278 grants distributed for affected by heavy rain MLA Ranajagjitsinh Patil gave information : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी ₹ 1278 कोटी दिवाळीपासून आजवर शेतकर्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
बांगलादेश हादरला! ढाकामध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपातील पिकांना बसलेल्या फटक्यामुळे पीकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणीही आता दूर झाल्या आहेत. पीक कापणी प्रयोगातील काही बाबींवर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे. पीकविमाही लवकरच शेतकर् यांच्या थेट खात्यात जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल, याची खात्री असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
Virat Kohli : BCCI नाराज होताच किंग कोहलीचा मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धेत खेळण्यास तयार
दरम्यान यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांरना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अनुदान आणि मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्यांफना नुकसानीच्या दुःखातून बाहेर काढून त्यांना नव्या उमेदीने उभे करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने अभुतपूर्व मदतीचा हातभार दिला आहे. एकंदरीत अडचणीच्या काळात अत्यंत संवेदनशीलपणे आपल्या महायुती सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. खंबीरपणे अडचणीच्या काळात अभुतपूर्व मदत दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारचे धन्यवाद मानले आहेत.
तलाठ्याची गरज संपली, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार
जिल्ह्यात सन २०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतीपीक व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण ९,७६,८२५ खात्यांवर तब्बल ₹१२७८.६८९७ कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. या आर्थिक सहाय्यामध्ये पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, रब्बी पेरणी व इतर आनुषंगिक बाबींसाठीच्या मदतीचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निकषांनुसार ३ हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे.
छत्तीसगडमधील विजापूर-दंतेवाडा सीमेवर मोठी कारवाई, चकमकीत 12 माओवादी ठार
अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच सामाईक क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी अनुदान ज्यांच्या नावावर घ्यावयाचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचे संमतीपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कागदपत्रांची पूर्तता व ई-केवायसी पूर्ण झालेल्या खात्यांवर अनुदान वितरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
मराठी माणूस होणार भाजप अध्यक्ष? मुख्यमंत्री फडणवीसांसह ‘या’ नावांची चर्चा
अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांना दिलेला शब्द आपल्या महायुती सरकारने पाळला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी धाराशिव जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. कठीण काळात शेतकऱ्यांना मिळणारे हे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही समाधानकारक बाब आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
पीक विमाही लवकरच मिळणार
पीक विमा खरीप 2025 संबंधित प्रक्रिया सुरू असून पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. शासन व प्रशासनासोबत शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
