माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री… शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा

Suhas Babar यांच्या या विधानामुळे खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Suhas Babar

Suhas Babar statemet for warn to BJP by saying your Chief Minister because of 242 MLAs like me : राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने प्रचारावर परिणाम झाला असला तरी देखील अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेमध्ये मात्र चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. अशा एका प्रचार सभेमध्ये माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे. असं म्हणत शिंदेंच्या आमदाराने स्थानिक भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

नेमकं काय घडलं?

राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये खानापूर येथे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर तेथील स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा एकेरी उल्लेख केल्याची त्यांच्यावर टीका देखील होत आहे.

नेमकं काय म्हणाले सुहास बाबर?

या आटपाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजप हे सर्व मी चालवतो. मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर… मी विट्यात काय केला आहे? हे माहित आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे? मुख्यमंत्रीच उत्तर देतील.

follow us