Asian Champions Trophy : भारताचा दबदबा ! जपानला 4-1 ने धूळ चारत सहाव्यांदा पटकावले विजेतेपद

Asian Champions Trophy: पंजाबमधील मोहालीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा धुव्वा उडवित विक्रमी सहाव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Hockey India

India vs Japan Final : भारतीय हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy) 2026 मध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. पंजाबमधील मोहालीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा धुव्वा उडवित विक्रमी सहाव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.

विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून भारतीय संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात सुरुवातीला भारतीय संघाला संघर्ष करावा लागला आहे. पहिल्या हाफमध्ये जपानने आघाडी घेत भारताला 0-1 ने पिछाडीवर टाकले होते. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले.

भारताकडून दिलप्रीत सिंग, जुगराज सिंग, विवेक सागर प्रसाद आणि शिलानंद लाकरा यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ आणि उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर जपानच्या बचावफळीला भेदत शानदार विजय मिळवला.

या विजयासह भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहाव्यांदा विजेतेपद पटकावले असून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा पराक्रमही केला आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे हॉकी चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

follow us