Asian Champions Trophy भारतीय हॉकी संघाची घोषणा, चीनमध्ये ‘हे’ 18 खेळाडू करणार कमाल!

Asian Champions Trophy भारतीय हॉकी संघाची घोषणा, चीनमध्ये ‘हे’ 18 खेळाडू करणार कमाल!

Asian Champions Trophy : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) शानदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Team) पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. नुकतंच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Asian Champions Trophy) भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 18 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान हुलुनबुर, इनर मंगोलिया, चीन येथे होणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशिया खंडातील अव्वल हाॅकी खेळणारे देश, भारत, पाकिस्तान, कोरिया, मलेशिया, जपान आणि चीनचा समावेश आहे.

गतविजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व यावेळी हरमनप्रीत सिंगकडे (Harmanpreet Singh) असणार आहे तर मिडफिल्डर विवेक सागर प्रसादकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कांस्यपदक सामन्यानंतर गोलरक्षक पीआर श्रीजेशने निवृत्ती घेतली होती त्यानंतर संघात कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांची निवड करण्यात आली आहे.

तर डिफेंडरमध्ये जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि सुमित यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मिडफिल्डमध्ये राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद रशील मूसीन दिसणार आहे तर फॉरवर्डमध्ये अभिषेक, सुखजित सिंग, अरिजित सिंग हुंडल, उत्तम सिंग आणि गुरज्योत सिंग यांचा संधी मिळाली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शानदार कामगिरी करणारे 10 खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे तर हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंट सिंग यांना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघ

गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, सूरज कारकेरा

डिफेंडर्स : जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जगराज सिंग, संजय, सुमित

मिडफिल्डर: राज कुमार पाल, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद रशील मूसीन

वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चावर बनवला, टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

फॉरवर्डः अभिषेक, सुखजित सिंग, अरेजित सिंग हुंडल, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग

follow us
  • fb
  • instagram
  • youtube