Paris 2024 Olympics : भारतीय हॉकी संघ जाहीर, हरमनप्रीत सिंग कर्णधार; 5 नवे खेळाडू करणार पदार्पण

  • Written By: Published:
Paris 2024 Olympics : भारतीय हॉकी संघ जाहीर, हरमनप्रीत सिंग कर्णधार; 5 नवे खेळाडू करणार पदार्पण

Hockey India Announces Men’s Squad for Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकसाठी 16 सदस्यीय भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून, संघाची कामान हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत. टीम इंडियाने गेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. भारतीय संघाला टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या गतविजेत्या बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसह पूल बी मध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघात कुणा कुणाला स्थान 

गोलकीपर: पी आर श्रीजेश.

डिफेंडर : जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, सुमित, संजय.

मिडफील्डर : राजकुमार पाल, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद.

फॉरवर्ड : अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंह, गुरजंत सिंह.

वैकल्पिक खेळाडू : नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादुर पाठक

भारत जोडोनंतर आता आषाढी वारी? राहुल गांधी करणार ‘विठु नामाचा’ गजर

पाच खेळाडू करणार ऑलिम्पिकमध्ये पदार्पण

पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय हॉकीसंघात पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पदार्पण करणार आहेत. संघात अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि मिडफिल्डर मनप्रीत सिंग यांना संघात स्थान देण्यात आले असून  दोन्ही खेळाडू चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यासोबतच गोलकीपर म्हणून कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीकांत शर्मा आणि डिफेंडर म्हणून जुगराज सिंग हे अतिरिक्त खेळाडू म्हणून पॅरिसला जाणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये जर्मनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक आणि सुखजित सिंग यांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube