Israel Vs Iran War: इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अलिरेझा अराफी
Israel Vs Iran War- इराणचे सर्वोच्च सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांची जागी तात्पुरती नियुक्ती
Israel Vs Iran War: अमेरिका, इस्रायल व इराणध्ये संघर्ष पेटला आहे. अमेरिका व इस्रायलने संयुक्तपणे इराणवर क्षेपणास्त्र डागले आहेत. त्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणनेही प्रत्युत्तरात अनेक देशांवर हल्ले केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांची जागी तात्पुरते नव नेतृत्व नियुक्त करण्यात आला आहे. अनुभवी धर्मगुरु आणि खामेनी यांचे जवळचे सहकतारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांच्याकडे इराणचे नेतृत्व देण्यात आलं आहे. (Who Is Ayatollah Alireza Arafi? Iran’s Interim Supreme Leader After Khamenei’s Death)
कोण आहेत अलिरेझा अराफी ?
1959 मध्ये याझद प्रांतातील मेयबोद येथे जन्मलेले अराफी एका धर्मगुरू कुटुंबातून आले आहेत. त्यांनी इराणच्या धार्मिक आणि नोकरशाही संस्थांमध्ये दशके घालवली आहेत. त्यांनी इराणच्या प्रमुख मदरसा शहर असलेलवे कोम येथे धार्मिक विद्वानांकडून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुज्ताहिदची पदवी मिळवली असल्याने ते स्वतंत्र इस्लामिक कायदेशीर निर्णय जारी करण्यास पात्र आहेत. ते खोमनी यांचे जवळचे सरकारी राहिले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक महत्त्वाचे पदेही देण्यात आली होती. अराफी यांनी अल-मुस्तफा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. ही इराण आणि परदेशातील धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था आहे. तर 2019 मध्ये त्यांना शक्तिशाली गार्डियन कौन्सिलमध्ये नियुक्त करण्यात आले. ही घटनात्मक संस्था कायदे आणि उमेदवारांची तपासणी करते.
Under Article 111 of the Constitution, the Expediency Discernment Council has appointed Ayatollah Alireza Arafi as the Guardian Council jurist in the temporary Leadership Council, ensuring continuity until the Assembly of Experts selects a new leader. #Iran pic.twitter.com/r4qDbvxWu2
— IWN (@A7_Mirza) March 1, 2026
अराफी यांना इराणच्या धार्मिक नोकरशाहीमध्ये व्यापक अनुभव आहेत. परंतु ते स्वतंत्र राजकीय निर्णय घेण्यास ते सक्षम नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशातील अंतर्गत संघर्ष आणि युद्धाच्या परिस्थितीत ते कसे निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.
