Dubai Flight Hijacked : दुबईहून निघालेल्या विमानाचं हायजॅक? इस्रायलमध्ये खळबळ
Dubai Flight Hijacked : दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान आणीबाणीच्या परिस्थितीमुळे सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले असल्याची माहिती
Dubai Flight Hijacked : दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान आणीबाणीच्या परिस्थितीमुळे सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले असल्याची माहिती समोर आल्याने इस्त्रायलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विमान हायजॅकिंगचा मेसेज विमातून देण्यात आला अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे या घटनेमुळे तेल अवीवमध्ये खळबळ उडाली असून, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक बैठक बोलावली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ‘फ्लाय दुबई’ (Flydubai) चे बोईंग 737 मॅक्स विमान दुबईहून उड्डाण करून इस्रायलची (Israel) राजधानी तेल अवीवकडे (Tel Aviv) निघाले होते. मात्र, उत्तर सौदी अरेबियात (Saudi Arabia) पोहोचल्यानंतर त्याचा मार्ग बदलण्यात आला. विमानातून ‘स्क्वॉक 7700’ (Squawk 7700) हा कोड प्रसारित करण्यात आला, जो विमानात आणीबाणीची परिस्थिती असल्याचे दर्शवतो.
Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक; नीरू आणि कायनान यांची चमकदार कामगिरी
काही वृत्तांमध्ये असेही म्हटले आहे की, ट्रान्सपॉन्डरचा कोड काही काळासाठी ‘7500’ (हायजॅकिंगचा कोड) वर बदलण्यात आला होता. तरीही याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे विमान सध्या सौदी अरेबियातील ‘तबुक’ शहराकडे जात आहे. इस्रायलमधील एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, विमान लवकरच लँड होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. यासंदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत निवेदन येण्याची अपेक्षा आहे.