Israel Hamas War : इस्त्रायलपुढे मोठं आव्हान; राजधानी तेल अवीववर हमासचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला

Israel Hamas War : इस्त्रायलपुढे मोठं आव्हान; राजधानी तेल अवीववर हमासचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला

Israel Hamas War Hamas Attack on Tel Aviv : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही ( Israel Hamas War ) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात.मात्र यावेळी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलची राजधानी तेल अवीववर ( Tel Aviv ) मोठा रॉकेट हल्ला केला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये काही जीवित हानी झाल्याचं अद्याप समोर आले नाही. दरम्यान गेल्या सात महिन्यातील हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. त्यामुळे हमासच्या एवढा मोठा हल्ला करण्याच्या क्षमतेने इस्रायलची चिंता वाढली आहे.

पश्चिम बंगालच्या Cyclone Remal चा राज्यावर परिणाम? अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये घुसून अनेक लोकांची हत्या करत त्यांना बंदी बनवलं आहे. यामध्ये 128 इस्त्रायलली अद्याप देखील हमासच्या ताब्यात आहेत. ज्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात येते. त्या विरुद्ध इस्त्रायलने देखील अनेकदा हमासला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे.

Horoscope Today : मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा वृषभ राशीसाठी कसा आहे, आजचा दिवस

मात्र या इस्त्रायल हमास युद्धामध्ये गाजा पट्टीतील नागरिकांनी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. तर गाजमध्ये इस्त्रायलकडून आत्तापर्यंत जवळपास 36 हजार लोकांना मारण्यात आल्याचा हमासद्वारे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान हमारे आता केलेल्या रॉकेट हल्ल्यामुळे इस्रायलचे राष्ट्रपती नेत्यान्याहू यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण अगोदरच हमासने बंदी बनवलेले इस्त्रायली नागरिक सोडून आणण्यासाठी नागरिकांकडून सरकार विरोधात तेल अवीवमध्ये आंदोलन करण्यात येत आहेत. त्यात आता या हल्ल्यानंतर इस्त्रायल सरकारची चिंता आणखी वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज