ट्रम्प यांच्या अल्टीमेटमनंतर हमासने गुढघे टेकले! गाझावरील ताबा अन् इस्त्राइली बंधकांना सोडणार

Israel Hamas War संपण्याची शक्यता आहे. कारण हमासने ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी आखलेली योजना आणि काही अटी शर्ती हमासने मान्य केल्या आहेत.

Israel Hamas War

Israel Hamas War will end Hamas leave Gaza and release Israeli hostages after Trumps Ultimatum : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध आता संपण्याची शक्यता आहे. कारण हमास या दहशतवादी संघटनेने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टमेटमनंतर मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आखलेली योजना आणि काही अटी शर्ती हमासने मान्य केल्या आहेत. त्यामुळे लवकरच इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध आता संपण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर दिली माहिती

याबाबत ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हमासने नुकतेच एक स्टेटमेंट दिले आहे. त्यानुसार ते आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे इस्त्राइलला देखील गाझावरील बॉम्बहल्ले थांबवले पाहिजे. जेणे करून आपण बंधकांना सुरक्षित आणि लवकरात लवकर बाहेर काढू. या सर्व बारीक गोष्टींवर पहिल्यापासूनच चर्चा सुरू आहे. हे फक्त गाझासाठीच नाही तर मध्य-पुर्वेमध्येही अनेक वर्षांपासूीन शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहोत.

गौतमी पाटीलला अटक होणार? पुण्यातील अपघात प्रकरणी थेट चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन

दरम्यान या प्रकरणावर ट्रम्प यांच्या बॉम्बहल्ले थांबवण्याच्या आवाहनानंतर इस्त्राइलचं म्हणणं आहे की, गाझामध्ये युद्ध थांबवण्याची ट्रम्प यांच्या योजनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून आज शनिवारी एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, इस्त्राइल ट्रम्प यांच्या योजनेनुसार युद्ध समाप्तीला पुर्ण सहकार्य करेल.

ट्रम्प यांचा हमासला अल्टीमेटम!

ट्रम्प यांनी हमासला अल्टीमेटम दिला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, हमासमुळे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना उशीर झाला. त्यामुळे या शेवटच्या प्रयत्नाला यश न आल्यास हमासवर अशी कारवाई केली जाईल. जी पहिले कधीही झाली नाही. पण पश्चिम आशियात शांतता प्रस्तापित करूच. त्यासाठी ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी युद्ध समाप्तीची योजना मांडली होती.

follow us