गौतमी पाटीलला अटक होणार? पुण्यातील अपघात प्रकरणी थेट चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन

Gautami Patil ला पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. तसेच चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Gautami Patil Pune Accident Chandrakant Patil

Gautami Patil Pune Accident Chandrakant Patil Call to DCP : कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी नृत्यांगना तसेच अभिनेत्री गौतमी पाटील हिला पुण्यातील एका अपघात प्रकरणी थेट अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली आहे. तसेच कोथरूड चे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र हे प्रकरणं नेमकं काय जाणून घेऊ…

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

कधी चढ-उतार कधी आनंदी-आनंद कसा आहे? बाराही राशींसाठा आजचा दिवस जाणून घ्या…

मात्र या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1994 चा जीआर रद्द करा! मनोज जरांगे यांची नवी मागणी; बोगस, प्रगत जातींना आरक्षणातून बाहेर काढा

दरम्यान या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. यासाठी ठिय्या आंदोलन केले. कारण पोलिसांनी गौतमीला चौकशीसाठी 30 सप्टेंबरला बोलावल्याची माहिती होती. पण ती चौकशीसाठी न येता शो करत महाराष्ट्रामध्ये फिरत होती. त्यामुळे गौतमीला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे.

follow us