ट्रम्प यांनी पुन्हा उपसले टॅरिफचे हत्यार! भारताला थेट सार्वजनिक भाषणात दिली करवाढीची धमकी
Donald Trump यांनी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताला थेट सार्वजनिक भाषणात करवाढीची धमकी देत पुन्हा एकदा टॅरिफचे हत्यार उपसले आहे.
US President Donald Trump Threat to India for increase Tariff in Speech : अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. (USA) अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. त्यानंतर काही तासांच्या आतच उत्तर कोरियानं आता थेट जपानच्या दिशेनं मिसाईल डागले आहेत. या दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून कराच्याबाबतीत शांत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट सार्वजनिक भाषणात करवाढीची धमकी देत पुन्हा एकदा टॅरिफचे हत्यार उपसले आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा उपसले टॅरिफचे हत्यार!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास 50 टक्के आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे वक्तव्य एका सार्वजनिक भाषणात केला आहे. तर याच भाषणामध्ये दुसरीकडे ट्रम्प यांनी मोदींचा कौतुकही केलं. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खूप चांगले माणूस आहेत. त्यांना माहीत होते की, मी रागावलेलो आहे. त्यामुळे ते माझा राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांनी रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवले जाऊ शकते.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”><a href=”https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&ref_src=twsrc%5Etfw”>#WATCH</a> | On India’s Russian oil imports, US President Donald J Trump says, "… They wanted to make me happy, basically… PM Modi's a very good man. He's a good guy. He knew I was not happy. It was important to make me happy. They do trade, and we can raise tariffs on them very… <a href=”https://t.co/OxOoj69sx3″>pic.twitter.com/OxOoj69sx3</a></p>— ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/2008009796738486321?ref_src=twsrc%5Etfw”>January 5, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
मनसे उमेदवाराला उद्धव ठाकरेंची भेट; सेना-भाजपच्या जोरदार घोषणाबाजीने राडा बोरीवलीमध्ये तणाव
दुसरीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. यामध्ये ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कचे नेतृत्व केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेच्या मते, ही संपूर्ण कारवाई अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील व्यापक मोहिमेचा भाग आहे. मात्र, मादुरो यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, व्हेनेझुएलाकडे असलेल्या प्रचंड तेलसाठ्यांमुळेच अमेरिका आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, वॉशिंग्टनने व्हेनेझुएलावर आर्थिक आणि सामाजिक दबाव वाढवला असून, कडक निर्बंध, व्हेनेझुएलाचे कच्चे तेल वाहून नेणाऱ्या टँकरची जप्ती आणि देशाच्या हवाई क्षेत्राचे अनौपचारिक बंद असे वर्णन करण्यात येणारे उपाय यामध्ये समाविष्ट आहेत.
