कर्जमाफी, ड्रग्स, अजितदादांच्या विमान अपघातावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार ! बैठकीत ठरले मुद्दे

Maharashtra Budget Session 2026: , चहापानाकरिता वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचे पत्र आले होते. परंतु आम्ही सरकारच्या चहापानाला जाणार नाहीत.

  • Written By: Published:
Mahavikas Aghadi

Maharashtra Budget Session 2026: सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्याबाबत शंका व्यक्त होत आहे. सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप उबाठा गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलाय. शेतकरी, ड्रग्सचा प्रश्न, सोलर लाइटमध्ये बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ही करण्यात आलाय.

राज्यसभा निवडणुक – आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

या पत्रकार परिषदेला उबाठा गटाचे आदित्य ठाकरे, अनिल परब, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बंदी पाटील हेही उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. भास्कर जाधव म्हणाले, चहापानाकरिता वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचे पत्र आले होते. परंतु आम्ही सरकारच्या चहापानाला जाणार नाहीत. सत्ताधारी पक्षाचे वर्तन सभ्येतेचे असावे लागते. लोकशाही व संविधानाचे सन्मान करणारे वर्तन, सभ्य वागणूक सत्ताधारी पक्षाची लागते. पण प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये आहे. ज्यांना लोकशाही, संविधानाचा आदर नाही, त्या ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात झाला आहे, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. याबाबत सरकारची भूमिका संदिग्ध आहे. सरकारने स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. पिकविम्यापोटी सरकारने शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि त्यानंतर ही योजनाच बंद केली आहे. सोलर लाइट संदर्भात सरकारने खूप गाजावाजा केला आहे. बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार सोलर प्रकल्पात झाल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय.

खाकीला ‘रील्स’वर ब्रेक, महाराष्ट्र पोलिसांचा कडक आदेश, नियमभंग केल्यास शिस्तभंग कारवाई

संपूर्ण राज्यात कायदा -सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हे राज्य आता उडता पंजाब होत आहे का ? अशी भिती निर्माण झाली आहे. ड्रग्स प्रचंड प्रमाणात विकले जात आहे.एका बाजूला चहापानाला बोलवत आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा पिढीला ड्रग्स दिले जात आहे. नागपूरमध्ये वाइट घटना घडतात. त्यांचा चहापानाला जायची आमची इच्छा नाही. मंत्रालयात एसीबी एक दालन सील करते, याचा अर्थ सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलित अडकलेले असल्याचा आरोपही भास्कर जाधवांनी केलाय.

एकीकडे कर्जमाफी देतो म्हणाले होते, अजून कर्जमाफी नाही. लाडकी बहिण योजनेचे पैसे आता सरसकट दिले जात नाही. आता 57 लाख महिला योजनेतून महिला कमी केल्या आहेत. सभापती किंवा अध्यक्ष हे पक्षाचे कार्यक्रमाला जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष अलिबागला हे जमिनीचा तंटा सोडायला गेले होते की जमीन लाटायला गेले होते, असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.

follow us