दूध भेसळीतील पडद्याआडचा सूत्रधार मी नाही…पण कळेल खरा आका कुठे आहे ? वळसेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
Dilip Walse: दूध भेसळीप्रकरणात जवळचा कार्यकर्ता असला तरी मी पाठीशी खालू शकत नाही. पडद्याआडचा सूत्रधार मी नाही हे लक्षात ठेवा.
NCP leader Dilip Walse on Manchar Milk Adulteration Case: पुणे: जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. भेसळीच्या वस्तू मंचरमधून राज्यभर पुरविल्या जात होत्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यावरून माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना विरोधकांनी घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम यांनी थेट वळसेंविरोधात आंदोलन सुरू केले आहे. विरोधकांनी राळ उठविल्यानंतर वळसे यांनी मंचर येथे कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करून आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.
दूध भेसळीप्रकरणात जवळचा कार्यकर्ता असला तरी मी पाठीशी खालू शकत नाही. पडद्याआडचा सूत्रधार मी नाही हे लक्षात ठेवा. येथे सूत्रधारच नाही, येथे इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा आका कोण ? असे विचारले गेले. अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा आका कुठे आहे ? असा सवाल वळसे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, मी अशा प्रकारच्या भेसळीचे समर्थन करू करत नाही. कोणीही असो पाठीशी घालणार नाही. ही घटना आंबेगावात घडली का ? पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात छापे पडले आहेत. जाहीरपणे सांगतो जवळचा कार्यकर्ता असला तरी पाठीशी घालू शकत नाही. जोपर्यंत मी बोलत नाही, तोपर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक संशयकल्लोळ चालू होता हे खरेच असेल का ? काय असेल ते मुंडेसाहेब ठरवतील. त्यावर बोलू. त्यात आता खोलात जाणार नाही.
तुमच्या मनात आणि माझ्या मनात कुठल्याही कोणाताही संशय असू नये. मी स्पष्ट भूमिका मांडत आहे. मी बोलत नाही. मी गप्प आहे. काहीतरी यात भानगड आहे, असा कांगावा काही लोकांनी करून तालुकाला बदनाम करायला सुरु केले आहे. शेवटी चौकशीमध्ये काय ते समोर येईल. त्यांच्या पडद्याआडचा सूत्रधार मी नाही हे लक्षात ठेवा. येथे सूत्रधार नाहीत. इतकी मजल पुढे गेली आहे का या तालुक्याचा आका कोण आहेत ? अरे सांगायला गेलो तर तालुक्याला कळेल खरा आका कुठे आहे ? इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही, असे वळसे म्हणाले.
माझ्याविरोधातील कटकारस्थानासाठी विषय काढला-वळसे
मला एक विचारायचे आहे, ही छापेमारी झाली. त्यात दोन कार्यकर्ते पकडले गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डेअरीवर छापेमारी झाली की नाही. त्यावर ब्र का निघत नाही. काकांच्या पुतण्याने काय केले मला माहिती नाही. ते जेलमध्ये आहेत. त्याला अडवायाला गेलो नाही, सोडा म्हणून. भेसळचा विषय लहान नाही. भेसळ दूधात होते का ? चिकनमध्ये,मटण, तांदळात, मसाला, औषधत भोसळे होते. विचाराची डोक्यात भेसळ झाली आहे. ती खरी भेसळ आहे. ती खरी भेसळ तुम्ही काढा. मग तुम्हाला दूधावर, भेसळीवर व इतरांवर काय बोलायचे आहे. हा विषय शेतकऱ्यांच्या हिताशी काढला आहे का ? दिलीप वळसेंच्याविरोधातील राजकारण, कटकारस्थानासाठी
विषय काढलेला आहे, असे उत्तर विरोधकांना वळसे यांनी दिले आहे.