शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल विधेयकाच्या बाजूने

Delimitation Bill 2026 :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट केंद्र सरकरच्या डिमिलिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी करत असल्याची

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Delimitation Bill 2026

Delimitation Bill 2026 :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट केंद्र सरकरच्या डिमिलिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकावर सविस्तर चर्चा झाली असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यांची मते जाणून घेतली. बहुतांशी जिल्हाध्यक्षांचा या विधेयकाच्या बाजूने कल असल्याची असल्याचे समोर आलं आहे.

अनेक मतदारसंघांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मतदारसंघांचं विभाजन होणं गरजेचं असल्याचं मत या बैठकीत काही जिल्ह्याध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच या विधेयकाबाबत घाईघाईने भूमिका न घेता सर्वा बाबींचा विचार करुन भूमिका घेतली जाणार असं आश्वासन जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशात महिला आरक्षण कायदा आणि जीएसटी (GST) सारखे अनेक कायदे सर्वसंमतीने मंजूर झाले होते. त्याचप्रमाणे मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या विधेयकाबाबतही सर्वसंमती शक्य होऊ शकते. पक्ष हे विधेयक सादर होण्याची वाट पाहील, त्यातील तरतुदींचा अभ्यास करेल आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेईल.

डिलिमिटेशन विधेयक मंजूर होणार; शरद पवार अन् DMK देणार भाजपला पाठिंबा ? –

लोकसभेत 360 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता

सध्या 540 सदस्यांच्या लोकसभेत तीन जागा रिक्त आहेत. राज्यघटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी किमान 360 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असेल. यापूर्वी झालेल्या अधिवेशनात, ‘संविधान (131 वी घटनादुरुस्ती) विधेयक’ लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी, विरोधी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या 230 खासदारांनी याच्या विरोधात मतदान केले होते, तर सत्ताधारी एनडीए (NDA) च्या 298 खासदारांनी याला पाठिंबा दिला होता. 11 खासदार अनुपस्थित होते.

 

follow us