रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार?, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Congress Entry : रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चावरून प्रविण दरेकरांनी टीका करत राजकीय मोठं वक्तव्य केलं आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 24T180434.550

Rohit Pawar Congress Entry : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आमदार रोहित पवार (NCP) यांनी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा पाठिंबा नसल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. काही ठिकाणी पक्षाचे चिन्ह वापरले, तर काही ठिकाणी वापरले नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसने मात्र या मोर्चाला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना दरेकर म्हणाले की, रोहित पवार यांचा वारू बेफाम सुटला असून त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य नाही. त्यांना स्वतः नेतृत्व करण्याची घाई झाली असून शरद पवार यांच्यासारखे होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचा टोला त्यांनी लगावला.

…तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय! रोहित पवारांच्या मोर्च्याला पक्षाचा पाठिंबा नाहीच

काँग्रेसलाही सध्या नेतृत्वासाठी एखादा चेहरा हवा आहे. त्यामुळे रोहित पवार प्रसिद्धीसाठी काँग्रेसचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. केवळ नेतृत्वाच्या हव्यासापोटी त्यांचा हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. याचवेळी दरेकर यांनी एक खळबळजनक दावा करत रोहित पवार आज ना उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे भाकीत केले आहे.

दरेकर यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आगामी काळात एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे रोहित पवार सातत्याने भाजप आणि महायुतीविरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी केलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या दाव्यात कितपत तथ्य आहे आणि आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us