… तर 2022 मध्ये शरद पवार राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवलेंचा मोठा दावा

Ramdas Athawale On Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राज्यातील

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Ramdas Athawale On Sharad Pawar

Ramdas Athawale On Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात सुरु झाली आहे. शरद पवार राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसबोत जाणार असा दावा आता राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या दाव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. जर शरद पवार 2019 मध्ये एनडीएसोबत आले असते तर 2022 मध्ये देशाचे राष्ट्रपती झाले असते असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. मात्र शरद पवार एनडीएसोबत येण्यास तयार नाही असं देखील यावेळी रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

माध्यामांशी बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येतील की नाही काय माहित नाही. परंतु एकत्र यायला जर अजितदादा पवार असते तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संबंधातला निर्णय होऊ शकला असता. पण अजितदादा नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असं मला वाटत नाही. शरद पवार एनडीएमध्ये (NDA) येणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शरद पवारसाहेबांनी (Sharad Pawar) एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर ऐक्य, दोघांचं एकत्रीकरण आहे ते व्हायला काही अडचण नाही. पण शरद पवारांची भूमिका त्यांनी आता अनेक वेळेला मांडलेली आहे की, मी काही एनडीएसोबत जाणार नाहीये. जर 2019 मध्ये शरद पवारसाहेबांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर ते कदाचित 2022 मध्ये देशाचे राष्ट्रपती सुद्धा होऊ शकले असते. पण त्यावेळी त्यांनी तो निर्णय घेतला नाही आणि अजूनही त्यांची भूमिका एनडीएमध्ये न येण्याची आहे असं माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले.

शिवानी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही, जे पटत नाही ते स्पष्टपणे बोलते’-

तर दुसरीकडे डिलीमिटेश बिलाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असं देखील दावा राजकीय वर्तुळात जोराने करण्यात येत असल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us