अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली! 3,450 रुपये दर निश्चित; पहिली उचल 3,250 रुपये
Ahilyanagar Sugarcane Rate Raju Shetty: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
Ahilyanagar Sugarcane Rate Raju Shetty: अहिल्यानगर : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शेतकरी नेते, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या बैठकीत ऊसदराचा तिढा सुटला आहे. या बैठकीत उसाला प्रतिटन 3,450 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पहिली उचल 3,250 रुपये मिळणार असून, उर्वरित 200 रुपये दोन टप्प्यांत प्रत्येकी 100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापला होता. शेतकरी संघटनांनी उसाला योग्य दर मिळावा, यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी 3,700 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास 28 नोव्हेंबरपासून रास्तारोको आणि रेलरोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात बैठक झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती दर द्यायचा, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. अखेर प्रतिटन 3,450 रुपये दर निश्चित करण्यावर सहमती झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 3,250 रुपये दिले जाणार असून, उर्वरित 200 रुपये दोन टप्प्यांत अदा केले जाणार आहेत.