आमिर खान लव जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेडेसर, हज घोटाळ्यावर विरोधक बोलणार का? मंत्री राणे भडकले

Nitesh Rane On Aamir Khan : बॉलिवुड अभिनेता आमिर खानने नुकतंच तिसऱ्यांदा लग्न केल्याने तो सोशल मीडियावर चर्चेत असून काही लोक त्याच्या

Nitesh Rane On Aamir Khan

Nitesh Rane On Aamir Khan : बॉलिवुड अभिनेता आमिर खानने नुकतंच तिसऱ्यांदा लग्न केल्याने तो सोशल मीडियावर चर्चेत असून काही लोक त्याच्या समर्थनात तर काही लोक विरोधात बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार नीतेश राणे यांनी अभिनेत आमिर खानवर जोरदार हल्लाबोल करत आमिर खान लव जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेडेसर असल्याचा आरोप केला आहे. तसेच आता हिंदू समाजातील तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा असे आवाहन देखील राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे बोलताना मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी आमिर खानवर (Aamir Khan) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मंत्री नीतेश राणे म्हणाले की, आमिर खान हा लव जिहादचा (Love Jihad) ब्रँड अ‍ॅम्बेडेसर आहे. हिंदू समाजातील तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा. मंत्री नीतेश राणे श्री साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई नीलम राणे देखील होते. साई दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हज घोटाळ्यावर गप्प का?

तर यावेळी मंत्री राणे यांनी राम मंदिर देगणी चोरीवर बोलणाऱ्या विरोधकांवर देखील टीका केली आहे. राम मंदिर चोरीवर बोलणारे हज घोटाळ्यावर गप्प का? असा प्रश्न त्यांनी शिर्डी येथे बोलताना उपस्थित केला. यावेळी राणे म्हणाले की, राम मंदिर देणगी चोरीबद्दल बोलणारे हज घोटाळ्यावर गप्प का? इतर धार्मिक संस्थांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांवर ते का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

FIFA World Cup अर्जेंटिना सेमीफायनल खेळणार; स्वित्झर्लंड बाहेर

भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न

तसेच भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत करत आहे. ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायत सरपंच सुद्धा होऊ शकत नाही ते इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत असं देखील माध्यमांशी बोलताना राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले.

follow us