‘जिजाई’च्या ट्रेलरवर बॉलिवूडकरांची कौतुकाची थाप! रिंकू राजगुरूच्या भूमिकेलने वेधले लक्ष
Jijai trailer या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला या ट्रेलरने प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
Bollywood showers praise on the ‘Jijai’ trailer! Rinku Rajguru’s performance grabs attention : झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रिंकू राजगुरूची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता रितेश देशमुख, कुमुद मिश्रा, के. के. मेनन, निवेदिता भट्टाचार्य, दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, वासन बाला, स्वानंद किरकिरे, मनीष चौधरी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘जिजाई’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच संपूर्ण ‘जिजाई’ टीमचे अभिनंदन करत चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकाचे प्रकाशन; अनेक आठवणींचा उलगडा!
बॉलिवूडमधील या कलाकारांकडून मिळालेली कौतुकाची पावती ‘जिजाई’च्या संपूर्ण टीमसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. एका स्त्रीची जिद्द, तिचा आत्मसन्मान आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती अशा प्रभावी कथानकाची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’चे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले असून, झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.