महंत रामगिरी महाराज अन् आमदार नीतेश राणेंच्या विरोधात ‘चलो मुंबई तिरंगा रॅली’, काय आहे मागणी?

  • Written By: Published:
महंत रामगिरी महाराज अन् आमदार नीतेश राणेंच्या विरोधात ‘चलो मुंबई तिरंगा रॅली’, काय आहे मागणी?

Chalo Mumbai Tiranga Rally : महंत रामगिरी महाराज, आमदार नीतेश राणेंच्या विरोधात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची छत्रपती संभाजीनगर येथून ‘चलो मुंबई तिरंगा रॅली’ काढली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील इतरही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले आहेत.

अहो सर्वज्ञानी, उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला आधुनिक भस्मासूर; चित्रा वाघांचे टीकास्त्र

आक्षेपार्ह विधान

इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती. सरकारने कारवाई न केल्यास मुंबईपर्यंत मोर्चा काढू, असं सांगितलं होतं. रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Video : गुजरातची सुंदरी ठरली इंडिया मिस युनिव्हर्स; आनंद व्यक्त करताना काय म्हणाली रिया सिंघा?

महाराजांवर कारवाईची मागणी

आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता. मुस्लिमांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदू संतावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) माजी खासदार जलील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube