अहो सर्वज्ञानी, उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला आधुनिक भस्मासूर; चित्रा वाघांचे टीकास्त्र

अहो सर्वज्ञानी, उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला आधुनिक भस्मासूर; चित्रा वाघांचे टीकास्त्र

Chitra wagh attack On UBT : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदा संजय राऊ (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. उद्योजक मित्रांच्या फायद्यासाठी ही मंजुरी दिल्याची टीका राऊतांनी केली होती. त्या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

तुम्ही कॅामेडी शोचे कलाकार, ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा…; चित्रा वाघांची राऊतांवर टीका 

उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूरआहे. विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारा उद्धव ठाकरेंचा गट आहे, अशी टीका वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, अहो सर्वज्ञानी… संजय राऊत, तुमचा लेखी उद्योजकांकडून वुसली हाच फक्त महाष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे आणि शाखाप्रमुखांच्या आशीर्वादाने कोकण-मुंबईतील मराठी माणसाला वडापावची गाडी लावून देणे ही तुमची रोजगारी व्याख्या..!, अशी टीका केली.

क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! T20 वर्ल्ड कपनंतर ‘या’ संघांविरुद्ध भिडणार टीम इंडिया, वेळापत्रक जाहीर 

वाघ यांनी पुढं लिहिलं की, त्यामुळेच वाढवण बंदरासारखा 10 लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि तब्बाल 76,220 कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या महाकाय प्रकल्पातून कोकणासह महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलाणार प्रकल्प आकारला येत असलेला पाहून तुमच्या पोटात दुखणारच…नाणार सारख्या प्रकल्पातही कोकणी जनतेची दिशाभूल करून तुम्ही खोडा घालण्याचं काम चालवलंय तेही यामुळेच… वर उद्योग राज्याबाहेर चालल्याचा कांगावाही तुम्हीच करायचा… विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारे तुम्ही उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर आहात, अशी जहरी टीका वाघ यांनी केली.

दरम्यान, उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर आहे, या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज