तुम्ही कॅामेडी शोचे कलाकार, ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा…; चित्रा वाघांची राऊतांवर टीका
Chitra wagh on Sanjay Raut : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले, मात्र, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. मोदी आता ब्रँड नाही, ब्रॅंडी झाले, अशी टीका राऊतांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
तुम्ही पेपरवाले नाहीत तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय… त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा, अशी टीका वाघ यांनी केली.
ब्रॅंड आणि ब्रॅंडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी @rautsanjay61 तुम्ही पेपरवाले नाहीत तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय…
त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा… पण त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 20, 2024
चित्रा वाघ यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, ब्रॅंड आणि ब्रॅंडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पेपरवाले नाहीत तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय… त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा… पण त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका… नाही तर ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल लवकरच…, अशी टीका वाघ यांनी केली.
आंदोलनस्थळावरुन वडेट्टीवारांचा थेट CM शिंदेंना फोन, मुख्यमंत्र्यांनी ‘ओबीसीं’ना शब्दच दिला
राऊतांची टीका काय?
मोदी-शहा शिवसेनेला संपवायला निघाले होते. पण, ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी हलाहल पचवलं होतं, तशाच प्रकारे शिवसेना उभी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणऊन त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. ही शिवसेना संघर्ष आणि विचारांमधून उभी केली आहे. छत्रपतींनी दिल्लीपुढे जशी मान झुकवली नाही. त्याच महाराजांचा वारसा उद्धव ठाकरेंनी पुढे नेला. मला आश्चर्य वाटतं, आता भाजप धन्यवाद यात्रा काढतेय. अरे तुमचा पराभव झाला. मला वाटतं, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मोदी ब्रँड होते, आता मोदी ब्रँडी झाली. त्यामुळं भाजपवाले नशेत आहेत. आता ब्रँडीचे दोन दोन घोट हे मारत आहेत, अशी टीका राऊतांनी केली.
दरम्यान, आता चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत किंवा उबाठा गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वांचं आहे.