आंदोलनस्थळावरुन वडेट्टीवारांचा थेट CM शिंदेंना फोन, मुख्यमंत्र्यांनी ‘ओबीसीं’ना शब्दच दिला

आंदोलनस्थळावरुन वडेट्टीवारांचा थेट CM शिंदेंना फोन, मुख्यमंत्र्यांनी ‘ओबीसीं’ना शब्दच दिला

Vijay Wadettiwar : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात चांगलच वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Maratha Reservation) पुढे सरसावलेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं आमरण उपोषण सुरु आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज जालन्यात आंदोलनस्थळी दाखल होत लक्ष्णम हाके यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावूनच सोक्ष मोक्ष लावण्याचा प्रयत्न केलायं.

मी PMO कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार…सव्वा कोटींना गंडा, ‘घोटाळ’झेप घेणारी साताऱ्याची कश्मिरा पवार कोण?

वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करुन हाके यांच्या आंदोनाची दखल घेण्याबाबतची सूचना केलीयं. तसेच सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन सरकारने आंदोलनस्थळी सरकारच्या दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी केली. वडेट्टीवारांनी मागणी करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्याच मंत्र्यांचं शिष्टमंडळ आंदोलनस्थळी पाठवत असल्याचा शब्द दिलायं. तसेच आंदोलनकर्त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नसून आरक्षणाला धक्का लागणार नाही, याबाबत आपण पहिल्या दिवसापासून खबरदारी घेत असल्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी फोनवर दिलायं.

आंदोलनास्थळी विजय वडेट्टीवार दाखल होताच त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यासह वाघमारे यांच्या तब्येतीची विचारपूस करुन ओबीसी बांधवांना संबोधित केलंय. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यात ओबीसी जनतेचा उद्रेक वाढत चाललायं. मराठा आणि ओबीसी समाजातील संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही समाजाचे लोकं विवाह सोहळ्यात एकमेकांशी बोलत नाहीत. ओबीसी समाजात जातींची संख्या जास्त असल्याने एकत्र येत नाहीत पण त्याचा अर्थ आम्ही अन्याय सहन करु असा होत नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आम्ही अधिवेशनातही लावून धरणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिलायं.

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

तसेच आम्ही ओबीसी आहोत, आम्हालाही संघर्ष करावाला लागतो, याची जाहीर वाच्यता आम्हाला करता येत नाही. वेळ प्रसंगी आम्ही तेही लोकांसमोर मांडणार आहोत. ज्या दिवशी आमच्या नाकातोंडात पाणी येईल, त्या दिवशी आमचा संघर्ष लोकांसमोर मांडणार आहोत. राजकारणात आम्हालाही बुक्क्यांचा मारा सहन करावा लागतो. संघर्ष आमच्या पाचवीला पुंजला असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आम्हाला बाबासाहेबांमुळे ओबीसी आरक्षण अधिकार मिळाले आहेत. दुसऱ्या कोणाच्या पुण्याईमुळे आम्हाला आरक्षणाचा अधिकार मिळालेला नाही. आमचे अधिकार आणि आरक्षण कुणी काढून घेण्याचा प्रयत्न करु नका . सरकारने आमचा अंत पाहु नये या आंदोलनावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज