ये जंगलराज नही चलेगा, झावरेंसारख्या औरंग्याच्या औलादींना धडा शिकवू…; चित्रा वाघ यांचा इशारा

ये जंगलराज नही चलेगा, झावरेंसारख्या औरंग्याच्या औलादींना धडा शिकवू…; चित्रा वाघ यांचा इशारा

Chitra Wagh On Rahul Zaware : नगर दक्षिण लोकसभेला शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) भाजपचे सुजय विखेंचा (Sujay Vikhe) मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर लंके यांचे समर्थक असलेल्या राहुल झावरेंवर जीवघेणा हल्ला झाल्याने लंके आक्रमक झालेत. दरम्यान, आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गंभीर आरोप करत निलेश लंके यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘क्या हार मे, क्या जीत में..’ अटल बिहारी वाजपेयी यांची कविता म्हणत राजकीय कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंचे शांततेचे आवाहन 

चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, ये जंगलराज नही चलेगा… आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला. मात्र, शऱद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला.. पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरूवात केली. हाती 10-15 कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की, उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला, असा आरोप वाघ यांनी केला.

Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ पहिल्याच आठवड्यात फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी 

वाघ यांनी पुढं लिहिलं की, या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच, मात्र नवनिर्वाचित खासदार लंके झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागले. म्हणतात, ना यश पचवता आलं पाहिजे, आणि मिरवता देखील आलं पाहिजे. पण महाविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लालगी… पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावन भूमीत सहन केला जाणार नाही… झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना, या जिजाऊच्या लेकीच धडा शिकतील, अशी टीका वाघ यांनी केली.

दरम्यान, भाजप नेते सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी झावरेंवर हल्ला केल्याचं लंके समर्थक बोलत आहे. अशातच चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत राहुल झावरेंवर आरोप केले. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला आता खासदार निलेश लंके आणि राहुल झावरे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube