विमानाचे तुकडे, अर्धवट जळालेले कागदपत्रे अन् डायरी; विमान क्रॅश होताच घटनास्थळी नेमकं काय – काय सापडलं?

Ajit Pawar Death : आगामी जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात

  • Written By: Published:
Ajit Pawar

Ajit Pawar Death : आगामी जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. बारामती येथे विमान लँडिंगच्या वेळी विमान क्रॅश झाल्याने अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी मोठा स्फोट झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रमोद मदुरीकर यांनी दिली.

तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या मृत्यदेहाची ओळख नेमकी कशी पटली याची देखील माहिती माध्यमांशी बोलताना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अगोदरच गावामध्ये जाताना विमान थोड डगमगत होतं. दोन गावांच्यामधून जाताना विमान बरंच खालून जात होतं. साधारण 30-40 फुटाच्या अंतरावर विमान हलू लागलं होतं. तिसऱ्या राऊंडला धावपट्टीवर लँडिंग करताना जागेवरच विमानाचा स्फोट झाला. विमानाचे तुकडे झाले होते असं त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना प्रमोद मदुरीकर म्हणाले की, अपघात होताच दादा आम्हाला ओळखू आले. लक्षात येताच दादांची बॉडी आम्ही ॲम्बूलन्समध्ये टाकली. दुसरे त्यांचे पीए होते. त्यांचाही मृतदेह गाडीत ठेवला. अपघाताची माहिती कळताच अग्रिशमन दलही लगेच पोहोचले होते. आम्ही मृतदेह उचलायला आणि अग्रिशमन दल यायला एकच वेळ झाली असं प्रमोद मदुरीकर यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यामृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरुन झाली. त्यांच्या हातातील घड्याळ त्यांची शेवटची ओळख ठरली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने बारामती वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तर आता घटनास्थळावरुन काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये घटनास्थळी विमानाचे तुकडे, विमानाची सीट, काही अर्धवट जळालेले कागदपत्रे आणि डायरी सापडली आहे.

अचानक विमानाचा स्फोट झाला, आम्ही दादांची बॉडी स्ट्रेचरवर ठेवली अन्…, प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार-

अपघात कसा घडला?

समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने बारामती विमानतळापासून काही अंतरावर अजित पवार यांचा विमान क्रॅश झाला. विमान ज्या भागात कोसळले, तो भाग खोल होता आणि परिसरात झाडं झुडपं आणि उस शेती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडचणी येत होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे.

follow us