NCP : दोन शिलेदारांवर मोठी जबाबदारी; उमेश पाटील मुख्य प्रवक्ते तर सिद्धिकींची मुंबईच्या अध्यक्षपदी वर्णी
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची वर्णी लागली असून मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार झिशान सिद्धीकींवर देण्यात आलीयं.
Ncp News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) भूमिका कणखरपरे मांडणारे सोलापूरपचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यापर पक्षाने मोठी जबाबदारी दिलीयं. उमेश पाटील यांची जिल्हाध्यक्षपदावरुन थेट पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते निवड करण्यात आलीयं. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्धीकी यांची निवड करण्यात आलीयं. देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत उमेश पाटील आणि झिशान सिद्धिकी यांना नियुक्तपत्र देण्यात आलंय. त्यामुळे आता पुढील काळात उमेश पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची भूमिका मांडणार आहेत.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, लोकनेते अजितदादा पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी त्यांनी व्यक्त केली आहे.
झिशान सिद्दीकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. बाबा सिद्दीकींनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर चार दशकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी झिशान काँग्रेससोबतच राहिले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झिशान यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
तर उमेश पाटील सोलापुरातील नरखेड जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत. सोलापुरात अजित पवार गटाचे एक महत्वपूर्ण नेते ते मानले जातात. नेहमीच राजकीय वर्तुळात ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका कणखरपणे मांडत असतात. अजितदादांच्या निधनांतरही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यानंतर आता त्यांची वर्णी पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी लागलीयं.