उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
Sunil Tingare : मलाच तिकीट मिळणार अजितदादांनी स्वत: शब्द दिला असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी लेटस्अप मराठीशी बोलताना सांगितलंय.
दीपक मानकर आणि रुपाली ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली चाकरणकरांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं ट्विट करुन सांगितलंय.
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कल्पोकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
बारामती मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला हेच अद्याप निश्चित झालेलं नाही, राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्ष उमेदवार ठरवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी क्लिअर सांगितलंय.
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.
अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.
मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका, अशी चपराक रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांना दिलीयं.