राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कल्पोकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
बारामती मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला हेच अद्याप निश्चित झालेलं नाही, राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्ष उमेदवार ठरवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी क्लिअर सांगितलंय.
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.
अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.
मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका, अशी चपराक रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांना दिलीयं.
मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच अजित पवार गटात राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ यांनी ठासून सांगितलं. नाशिकमधील सुरगाण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलं आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
साखर पट्ट्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सात आमदारांवर मोदी सरकारची कृपा झालीयं. राष्ट्रीय सहकार विकास निगमने 1898 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलीयं.
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.