राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल, ही बातमी कल्पोकल्पित; चंद्रशेखर बावनकुळेंकडून कन्फ्यूजन क्लिअर
Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीयं. त्यामुळे अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) 25 उमेदवार निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. एकूण या परिस्थितीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कन्फ्यूजन क्लिअर केलंय. राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कल्पोकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा दिसणार; ‘तुझे मेरी कसम’ 21 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार
बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीकडून प्रकाशित झालेल्या याद्यांमध्ये मला तथ्य वाटत नाही, कारण महायुतीची बोलणी सुरू आहे. जोपर्यंत तीनही नेते एकत्रित पत्रकार परिषद घेत नाही तोपर्यंत अंतिम यादी समजू नये. मीडियाच्या बातम्या, नेत्यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मिळून एकत्रित योजना तयार केलीयं. जागावाटपाबाबत अशा बातम्या येतात त्याला काही अर्थ उरत नाही. आमच्याकडूनही अशा काही बातम्या येत असतील तर त्यालाही अर्थ उरत नाही. आम्ही तीनही पक्षांनी ठरवलंय की, एखादी जागा कमी जास्त होईल मात्र, जो जिंकेल त्यालाच जागा दिली जाणार आहे, राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कपोलकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
सुरू होण्याआधीच पॅकअप! क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ आठ सामन्यात फक्त पावसाचाच खेळ
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत 25 उमेदवारांची नावं जवळपास फायनल करण्यात आली आहेत. जागावाटपही लवकरच पूर्ण होणार आहे. यावर चर्चा सुरू आहे मात्र तयारी असावी यादृष्टीने आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. या उमेदवारांनाच तिकीट दिलं जाईल असे सांगितले जात आहे. यादी अजून बाहेर आलेली नाही. या यादीत 25 मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याची नावं आहेत. एकीककडे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीयं तर दुसरीकडे बावनकुळेंकडून अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये जागावाटपाबाबत नक्की काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केल्याच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडलीयं. ते म्हणाले, आमचा कुणालाही विरोध नाही. या देशात हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई, सर्व एकत्र येऊन देश हितासाठी काम करतात. मात्र, काही लोक या देशात राहून बांगलादेशी मुसलमान यांचं समर्थन करतात. या देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलतात अशा लोकांच्या आम्ही विरोधात असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.