लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन राष्ट्रवादी-शिवसेनेत खडाजंगी; उमेश पाटलांची नेत्यांना चपराक!
Umesh Patil News : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आज शिवसेनेच्या नेत्यांनी गदारोळ घालत राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेवर आक्षेप घेतलायं. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’ (Ajit Pawar) असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपलीय. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना चांगलीच चपराक दिलीयं. अर्थसंकल्पादरम्यान, ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ अशी बॅनरबाजी करण्यात आली, त्यावेळी आम्ही विरोध केला नसल्याची आठवण उमेश पाटलांनी करुन दिलीयं.
Lalbaugcha Raja : ‘लालबाग’चा राजा सार्वजनिक मंडळात अनंत अंबानींची मानाच्या पदावर नियुक्ती…
उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ म्हणून असे सर्वत्र फिरत होते. त्यावेळी आम्ही कोणीच काही म्हणालो नाही, याचं श्रेय फक्त मुख्यमंत्री घेत आहेत, असं आम्ही म्हटलो नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांनी हे श्रेय घेतलं पाहिजे कारण योजना चांगली लोकप्रिय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज शिंदे गटाच्या मंत्र्यांना गदारोळ करायची गरज नाही. उलट तानाजी सावंत यांनी उलट्या होतात असं विधान केलं त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असं उमेश पाटलांनी स्पष्ट केलंय.
मोठी बातमी! रशिया युक्रेनसोबत चर्चेस तयार; पुतिन म्हणाले, भारत-चीन करू शकतात मध्यस्थी
तसेच जर एकत्र काम करीत असेल तर आमच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा अपमान होत असेल तर सावंतांची हकालपट्टी का नाही केली? आज मंत्रिमंडळावर हा विषय घेतला पाहिजे होता. तानाजी सावंतांना तुमचं समर्थन आहे का? अजितदादांना महायुतीत घेण्याबाबत जे. पी. नड्डा, पंतप्रधान मोदी, मंत्री अमित शाहा यांनी निर्णय घेतलायं, त्याच्यामध्ये तानाजी सावंतसारख्या मंत्र्याला जी मळमळ जळजळ होतेयं ही मळमळ इतर मंत्र्यांच्याही डोक्यात घुसलीयं का? या शब्दांत पाटलांनी हल्लाबोल केलायं.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून ही योजना आम्ही आणली, असे सांगितले जात आहे, असा आक्षेप नोंदवून अजितदादा एकटेच कसे या योजनेचे श्रेय घेऊ शकतात, असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात केलायं.