BMC निवडणुकीत ट्विस्ट, अमराठी मतदार गेम फिरवणार; सर्व्हेतील आकड्यांनी खळबळ
AsceIndia Survey For BMC Election ठाकरे बंधूंसाठी आनंदाची बातमी, मुंबईतील मराठी माणूस खंबीरपणे पाठीशी उभा राहणार पण...
AsceIndia Survey For BMC Election : मतदानाची तारीख जशी-जशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचाराला रंग चढण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे बंधू असो किंवा भाजप-सेना असो दोघांकडूनही मुंबईत आमचाच महापौर बसणार असा दावा केला जातोय. एकीकडे मराठी अमराठीचा मुद्दा असो किंवा विकासाचे राजकारण या मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला जातोय. पण, या आरोप्रत्यारोपांच्या फैरींमध्ये एका सर्व्हेतील आकडेवारीवरून ठाकरे बंधू आणि सेना-भाजपात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत ठाकरे बंधूंना माफक यश मिळण्याचा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अमराठी मतदार भाजप आणि शिंदे गटाला भरभरुन मतदान करेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. नेमका हा सर्व्हे काय? यात कुणाला किती जागा मिळणार तसेच अमराठी मतदार नेमका कुणाच्या बाजूने आहे याबद्दल जाणून घेऊया…
मतदार ठाकरेंच्या बाजूने पण…
AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकी सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, असे असले तरी मुंबईत भाजप आणि शिवसेनेचीच सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?
AsceIndia ने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आलेल्या आकडेवारीनुसार मराठी मतदारांकडून भाजप-शिवसेना- 42 टक्के, ठाकरे गट- मनसेला 44 टक्के, लाकाँग्रेस- 4 टक्के तर, इतर उमेदवारांना 11 टक्के मतदान करतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणात मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने आहे याबाबतच्या आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना- 11 टक्के, ठाकरे गट- मनसेला 28 टक्के, काँग्रेसला 41 टक्के तर, इतर पक्षांना 20 टक्के मतदान केले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. AsceIndia Survey For BMC Election
गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी खर्च अन् 3 कोटीचा भ्रष्टाचार, साटम यांचा ठाकरेंवर आरोप
अमराठी मतदार निवडणूक फिरवणार
निवडणुकीच्या तोंडावर मराठी अमराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, हे अमराठी मतादार BMC निवडणुकीतील चित्र पलटवणार असल्याचा अंदाज AsceIndia च्या सर्व्हेतील आकडेवारीत वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत अमराठी मतदार भाजप-शिवसेनाला 53 टक्के, ठाकरे गट- मनसेला 15 टक्के, काँग्रेसला 19 टक्के तर, इतरांना 13 टक्के मतदान करतील असे सांगण्यात आले आहे.
