पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे पहिल्यांदाच पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 37 मधून निवडणुकीच्या रिंगणात.

  • Written By: Published:
Untitled Design (206)

Giriraj Sawant is contesting for the Pune Municipal Corporation for the first time : राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांची जोरदार धामधूम सुरू असून, सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी युती, तर काही ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार आपली ताकद आजमावत आहेत. पुणे महापालिकेतही मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे(Shivsena) माजी मंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांचे पुत्र गिरीराज सावंत(Giriraj Sawant) हे पहिल्यांदाच पुणे(Pune) महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 37 मधून निवडणूक लढवत आहेत. राजकारणात पदार्पणाबाबत बोलताना गिरीराज सावंत म्हणाले की, राजकारण सुरू करताना वेगळा आनंद किंवा उत्साह असल्याची भावना नाही, कारण समाजकारणाचा वारसा आम्हाला घरातूनच लाभला आहे. आम्ही पिढीजात समाजकारण करत आलो असल्याने हे काही वावगं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रभाग क्रमांक 37 हाच प्रभाग निवडण्यामागचं कारण सांगताना त्यांनी नमूद केलं की, माझा जन्म याच भागात झाला आहे. या परिसरात जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हापासून ते आज होत असलेली विकासकामं मी जवळून पाहिली आहेत. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता माझ्यात आहे. माझी नाळ या मातीशी जोडलेली असल्यामुळेच या प्रभागासाठी काम करण्याचा निर्धार मी केला आहे, असं ते म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत समाजहिताची विचारधारा केंद्रस्थानी ठेवून पुढे जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. राजकारणात सुसंस्कृतपणा जपला गेला पाहिजे आणि तो टिकवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. टीका-आरोप-प्रत्यारोप हे खेळभावनेने घेतले पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले

गिरीराज सावंत यांनी शहरातील प्रमुख समस्यांवरही भाष्य केलं. अलीकडच्या काळात ट्राफिक ही मोठी समस्या बनली असून, विस्थापित लोकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून, त्यावर ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा असून, अद्यापही अनेक नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत, असं त्यांनी नमूद केलं. मागील लोकप्रतिनिधींवर टीका न करता, या समस्या सोडवण्यावर आपलं लक्ष असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वीजवाहिन्या अजूनही अनेक ठिकाणी लटकत्या अवस्थेत असल्याचं निदर्शनास आणून देत, त्या अंडरग्राऊंड करण्याचं काम केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. यासोबतच गार्डन, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांवर विशेष लक्ष दिलं जाईल. शासनाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा त्यांनी केला. वडिलांकडे बालहट्ट केल्याप्रमाणे नागरिकांसाठी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, रस्ते, हॉल आणि बहुउद्देशीय केंद्रांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. कोणतंही पद नसतानाही समाजकारणाची जाणीव ठेवून लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आतापर्यंत सुमारे 15 ते 16 कोटी रुपयांची विकासकामं करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.

Ravindra Chavan On Thackeray Manifestos : ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच; ठाकरे बंधूंवर रवींद्र चव्हाण भडकले

घराणेशाहीच्या आरोपांवर उत्तर देताना गिरीराज सावंत म्हणाले की, केवळ वारसा म्हणून आणि पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही. मात्र आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लोकहिताची कामं करत आहोत. त्यामुळे फक्त वारसा आहे म्हणून घराणेशाही म्हणणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सामाजिक उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, शहरात गरजू आणि भुकेल्यांना अन्न देण्याचं काम आमच्याकडून सातत्याने केलं जातं. आमचं कुटुंब वारकरी संप्रदायातून आलेलं असून, केवळ बोलून नाही तर कृतीतून ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उद्देशाने बेघरांसाठी एक वेळ जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ज्यांना योगदान द्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही व्यवस्था खुली आहे.

आरोग्य शिबिरांचं आयोजनही नियमितपणे केलं जात असून, काही निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा लोकांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, या हेतूने महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. दक्षिण पुण्यात आयोजित या शिबिराचा सुमारे 32 हजार नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरांमध्ये विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार पूर्णतः मोफत देण्यात आले. सामाजिक एकोपा जपण्यासाठी सत्तेचा सकारात्मक वापर करता येतो, हे आम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून, राजकारणात येण्यापूर्वीपासूनच ही सेवा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे, हे पाप कोणाचं? CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

शेवटी बोलताना गिरीराज सावंत म्हणाले की, जनतेला राजकारण्यांकडून जशा अपेक्षा असतात, तशाच काही अपेक्षा माझ्याही आहेत. माझा प्रभाग स्वच्छ असावा, नागरी सुविधांची कमतरता नसावी, या दृष्टीने काम केलं तरच खऱ्या अर्थाने विकास साधता येईल. तानाजी सावंत हे स्वतः गरीब कुटुंबातून आले असल्यामुळे तळागाळातील समाजाच्या अडचणी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि त्याच अनुभवाच्या आधारावर ते काम करत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

follow us