गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे, हे पाप कोणाचं? CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Devendra Fadnavis : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचाराची सुरुवात झाली असून

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचाराची सुरुवात झाली असून आज वरळी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत सडकून टीका केली आहे. मुंबईतील प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली हे विचारले तर उत्तर उद्धव ठाकरे मिळतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वात मुंबईला जितकं काही मिळालं तितके आज जे आव आणून बोलतात त्यांच्या काळात का मिळाले नाही? कोस्टल रोड, बीडीडीचा विकास, मेट्रो कोणी केली? कोणीही सांगेल, पब्लिक है सब जानती है. या उलट प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली हे विचारले तर पब्लिक एकच नाव घेतील ते म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) . इतकी वर्षे आपण बोलबच्चन बघितले. 70 हजारांच्या फिक्स डिपॉझिटच्या रिसिट काय चाटायच्या आहेत. हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराल त्या दोन चार हजार कोटींत मुंबईत घर मिळाले असते. मराठी माणसाला त्याचे हक्काचे घर घ्यायचे आहे. बीडीडी चाळीचा अनेक वर्षांचा संघर्ष चालला होता. आम्ही निर्धार केला बीडीडी चाळी बिल्डरांंच्या घशात जाऊ देणार नाही. नाहीतर 80 हजार मराठी माणसे मुंबईतून हद्दपार होणार होती असं वरळी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या सभेत पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील लोकांना घर देऊ. महायुतीच्या सरकारने एसआरएच्या माध्ममातून घरं दिल्या, योजना आपल्या अजूनही सुरु आहेत. घरांच्या प्रश्न आम्ही सोडवत आहोत. आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला हे पाप कोणाचं? गिरणी कामगार हद्दपार झाला कोणामुळे? फिक्स्ड डिपॉझिटच्या रसिदी चाटायच्या का? असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

मुस्तफिजूर रहमानला IPL साठी नाकार देताच बांगलादेशात आयपीएल प्रसारणावर बंदी अन् टी20 विश्वचषकासाठी मोठा निर्णय

तसेच जर दोन हजार कोटी जरी काढले असते तरी गिरणी कामगार वाचला असता. बीडीडी चाळ आम्ही निर्माण केली, 80 हजार लोकं वाट बघत होते, मात्र यांनी बिल्डर्सच्या नादात सत्यानाश केला असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow us