मुस्तफिजूर रहमानला IPL साठी नाकार देताच बांगलादेशात आयपीएल प्रसारणावर बंदी अन् टी20 विश्वचषकासाठी मोठा निर्णय
Mustafizur Rahman : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर केले आहे.
Mustafizur Rahman : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर केले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील मोठा निर्णय घेत बांगलादेशमध्ये आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची योजना आखली आहे. तसेच फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतात होणाऱ्या बांगलादेशाचे सर्व सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी देखील बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली आहे.
आयपीएल 2026 साठी झालेल्या मिनी लिलावात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला (Mustafizur Rahman) 9.20कोटीमध्ये केकेआरने खरेदी केले होते मात्र बीसीसीआयच्या आदेशानंतर केकेआरने मुस्तफिजून रहमानला सोडले आहे. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) बैठक घेत बांगलादेशमध्ये आयपीएलवर (IPL 2026) प्रसार बंदीसाठी चर्चा केली आहे. तसेच टी20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशाचे भारतात होणारे चार लीग सामने श्रीलंकेत हलवण्यात यावे अशी मागणी देखील आयसीसीकडे करण्यात आली असल्याची माहिती बोर्डाचे सरकारी सल्लागार आसिफ नजरुल यांनी दिली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचे तीन सामने कोलकाता आणि एक मुंबईत होणार आहे.
बांगलादेशचे विश्वचषक सामने श्रीलंकेत व्हावेत
आसिफ नजरुल यांनी फेसबुक पेजवर लिहिले की, क्रीडा मंत्रालयाचे प्रभारी सल्लागार म्हणून, मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला संपूर्ण प्रकरण लेखी स्वरूपात सादर करण्याचे आणि आयसीसीला कळविण्याचे निर्देश दिले आहेत. बोर्डाने हे स्पष्ट करावे की जर करार असूनही बांगलादेशचा क्रिकेटपटू (Mustafizur Rahman Controversy) भारतात खेळू शकत नसेल, तर बांगलादेशचा राष्ट्रीय संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात प्रवास करण्यास सुरक्षित वाटू शकत नाही. मी बोर्डाला बांगलादेशचे विश्वचषक सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची औपचारिक विनंती करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच नझरुल म्हणाले की, त्यांनी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारांना बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण थांबवण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, मी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारांना बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण थांबवण्याची विनंती केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बांगलादेशी क्रिकेट, क्रिकेटपटू किंवा बांगलादेशचा अनादर सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस संपले आहेत.
तर दुसरीकडे टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास फक्त एक महिना शिल्लक राहिल्याने बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवणे अशक्य असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्राने दिली आहे. ते म्हणाले, कोणाच्याही इच्छेनुसार तुम्ही सामने बदलू शकत नाही. हे एक मोठे लॉजिस्टिक आव्हान आहे. विरोधी संघांबद्दल विचार करा. त्यांची विमान तिकिटे आणि हॉटेल्स आधीच बुक केलेली आहेत. शिवाय, प्रत्येक दिवशी तीन सामने आहेत, म्हणजेच एक सामना श्रीलंकेत आहे. तिथे ब्रॉडकास्टिंग क्रू देखील आहे. त्यामुळे, हे सांगणे सोपे होईल पण करणे सोपे नाही.
पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
