सोनं खरेदी करू नका, मोदींच्या या आवाहनामुळे जनतेचे पैसे वाचले! सोन्याचे दर 30 हजारांनी घसरल्याचा दावा

Modi Gold Buying Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे नागरिकांचे पैसे वाचल्याचा दावा.

Modi Gold Buying Appeal

Modi Gold Buying Appeal: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी घसरण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोन्याच्या दराबाबत (Gold Rate) भाष्य केलं आहे. वर्षभरापूर्वी आपण देशवासीयांना सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनामुळे लोकांचे पैसे वाचले असून सोन्याचे दरही घसरले, असा दावा मोदी यांनी केला. नागरिक आपले आभार मानत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

लखनौ (Lucknow) येथे आयोजित पाचव्या कौशल्यविकास दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी मोदींनी वर्षभरापूर्वी केलेल्या सोनं खरेदी टाळण्याच्या आवाहनाची आठवण करून दिली.  ते म्हणाले, एक वर्षापूर्वी मी देशवासीयांना आवाहन केलं होतं की, गरज नसेल तर एक वर्ष सोनं खरेदी करू नका. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने केलेल्या आवाहनाला देशवासीयांनी प्रतिसाद दिला आणि सोन्याची खरेदी कमी केली. त्यामुळे सोन्याचे दर घसरले. आज लोक मला सांगतात की, मोदीजी तुम्ही सांगितलं, आम्ही तुमचं ऐकलं आणि आमचे पैसे वाचले.

मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात किती घट?

पंतप्रधान मोदी यांनी 11 मे रोजी सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1.52 लाख रुपये होता. 20 नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून 1.22 लाख रुपयांवर आला. म्हणजेच या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 30 हजार रुपयांची घट झाली आहे.

ब्रेकिंग: भाजप खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याच्या आपल्या आवाहनामुळे नागरिकांचे पैसे वाचल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. मात्र, सोन्याच्या दरातील घसरण आणि खरेदी टाळण्याच्या आवाहनाचा थेट संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

follow us