Ravindra Chavan On Thackeray Manifestos : ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच; ठाकरे बंधूंवर रवींद्र चव्हाण भडकले
Ravindra Chavan On Thackeray Manifestos : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत असून यावर आता
Ravindra Chavan On Thackeray Manifestos : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत असून यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल करत ठाकरेंचा जाहीरनामा फक्त कागदावरच राहातो असं म्हटले आहे. नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, भाजप (BJP) जे शब्द देते ते पूर्ण करते, पण ठाकरेंचे जाहीरनामे (Thackeray Manifestos) फक्त कागदावरच राहतात अशी रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी नाशिक येथे भाजपमध्ये सुरु असणाऱ्या गोंधळावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. एबी फॉर्मबाबत जो काही प्रकरा घडला आहे, तो गांभीर्याने घेतला असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
तसेच अशा घटना भाजपमध्ये पहिल्यांदाच घडत आहेत, हे चुकीचे आहे. मी स्वत: या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले.
गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे, हे पाप कोणाचं? CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात
तर दुसरीकडे भाजपमध्ये पैसे देऊन तिकीट वाटप होत असल्याचा आरोपावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे असे कधीच होत नाही. आरोप करणाऱ्यांची समजूत काढली जाईल, पण अशा चर्चांमध्ये तथ्य नाही असेही माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच नाशिकच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून नाशिक महापालिका निवडणुकीत आम्ही 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास देखील माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आणि नाशिकमध्ये भाजपचाच महापौर बसवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत असं देखील त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
