पुण्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक; रवींद्र चव्हाण यांची माहिती

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सत्तेत असून, पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी - रवींद्र चव्हाण

  • Written By: Published:
Untitled Design (204)

Investment worth crores of rupees in Pune through the central and state governments : यंदाची महापालिका निवडणूक विकसित पुण्यासाठी निर्णायक ठरणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा कोण देऊ शकते याचा निर्णय जनता या निवडणुकीत घेणार आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले. पुण्यात(Pune) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप(BJP) सत्तेत असून, पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांची उपस्थिती होती.

रविंद्र चव्हाण म्हणाले, पुण्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. कोणतेही स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आश्वासन पुरेसे नसून, त्यादिशेने सातत्यपूर्ण काम आवश्यक असते. पुण्यात मेट्रो प्रकल्पाबाबत महापालिकेत ठराव होऊनही, केंद्र व राज्यात सत्ता असताना महाविकास आघाडीला मेट्रोचे काम सुरू करता आले नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करणे गरजेचे असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता केंद्र व राज्य सरकार गतिमान प्रशासन कसे असावे हे विविध विकासकामांतून दाखवून देत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा; संघात कोण आउट आणि कोण इन

आगामी काळात पुण्यात पायाभूत सुविधांसाठी सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी केंद्र व राज्य सरकारने दर्शवली आहे. यामध्ये एक हजार इलेक्ट्रिक बस, मेट्रो जाळ्याचे विस्तारीकरण, नदी सुधारणा कार्यक्रम, रिंगरोड, 24 तास पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला चालना देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. यंदा राज्यात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आली असून, उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. देशाला 2047पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, त्यामुळे ही महापालिका निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नसून पुढील भविष्य घडवणारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, ही टीका केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. नेमके आरोप आणि प्रत्यारोप कसे करायचे हे त्यांनी ठरवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ते सध्या सत्तेत काम करत असताना, त्या नेतृत्वाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. केवळ आरोप न करता, संबंधित यंत्रणांकडे रीतसर तक्रार करावी. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान न करता भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Video : काय बोलावं हा त्यांचा अधिकार; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं उत्तर

दरम्यान, या वेळी भाजपमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदारसंघातील माजी नगरसेविका शैलजा खेडेकर, अर्चना कांबळे, शिवसेना (उबाठा) नेते नाना वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे शशिकांत पांडुळे, वसुंधरा निरभवने, काँग्रेस शहर उपाध्यक्ष व निवृत्त पोलिस अधिकारी अनिल पवार, माजी नगरसेविका शारदा ओरसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविंद्र ओरसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सनी निम्हण आणि आदित्य माळवे उपस्थित होते.

follow us