न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा; संघात कोण आउट आणि कोण इन

वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (203)

BCCI announces Indian squad for ODI series against New Zealand : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. भारत(India) आणि न्यूझीलंड यांच्यातील ही वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार असून त्या मालिकेसाठीचा भारतीय संघ आधीच घोषित करण्यात आला आहे. वनडे मालिकेसाठीचा संघ आज म्हणजेच शनिवार 3 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल(Shubhman Gill) करणार आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे(Shreyas Ayyar) सोपवण्यात आली आहे. संघात केएल राहुल आणि रिषभ पंत यांचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर शुभमन गिलचे संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा देखील संघात समावेश करण्यात आला असून उपकर्णधार श्रेयस अय्यरचेहे पुनरागमन झाले असले तरी त्याला अंतिम सामना खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला काही काळ उपचार घ्यावे लागले होते, आणि तो क्रिकेटपासून दूर राहिला होता.

आम्हाला संधी द्या.., तुमचा कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांचं सांगलिकरांना आश्वासन

दरम्यान, मोहम्मद सिराज संघात परतला असला तरी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या मालिकेसाठी स्थान देण्यात आलेले नाही. शमीने भारताकडून शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. त्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार – फिटनेस चाचणीच्या अधीन), रिषभ पंत (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी.

follow us