Video : गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबात उमेदवारी अन् रवींद्र चव्हाणांची टीका, अजित पवारांचं थेट उत्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं.

News Photo   2026 01 03T185556.333

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माझ्यावर काय बोलले हे मला माहिती नाही. (Pune) परंतु, ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविंद्र चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर दिली आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना, ‘पुन्हा एकदा विचार करा’, असा सल्ला दिला होता. ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना खासगीत नेहमी सांगायचो, ‘साहेब थोडा विचार करा.’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत. त्यामुळे थोडासा विचार करा, असे मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिलं.

मी देवेंद्र फडणवीसांना खासगीत नेहमी सांगायचो साहेब, थोडा विचार करा; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंडू आंदेकर याची भावजयी लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर गंभीर आरोप आहेत, असं असताना देखील तिकीट दिल्यामुळे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका सुरू आहे.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले, समजा एखादा गुन्हेगार आहे, त्याने मोठा गुन्हा केला तर त्यात त्याच्या पत्नीचा काय दोष? मी काही तरी गुन्हा केला तर माझ्या पत्नीचा, मुलाचा, सूनाचा काय दोष आहे. मर्डर केला म्हणून अख्खं खानदान जबाबदार आहे? असं काही नाही. काही विकृती असते. ज्या काही याद्या आल्या आहेत, त्यात इतरांच्या याद्यात काही नावं कशी आहेत? आम्ही मित्र पक्षांना जागा सोडल्या. तेव्हा त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

follow us