भाजपचा यू टर्न; बदलापूर प्रकरणातील सहआरोपी आपटेंनी दिला स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा

बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना नगरपालिकेत भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिलं आणि नंतर लगेच राजीनामा

  • Written By: Published:
Untitled Design (237)

BJP gave him the first corporator post and then immediately resigned : बदलापूरमधील गाजलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी हा राजीनामा सादर केला असून, वाढत्या सामाजिक व राजकीय विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कालच कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत तुषार आपटेंची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपी असताना अशा पदावर नियुक्ती केल्याबद्दल भाजपवर सर्व स्तरांतून टीका सुरू झाली होती.

दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपने तातडीने तुषार आपटेंचा राजीनामा घेतला नाही, तर 13 किंवा 14 जानेवारी रोजी बदलापूरमध्ये मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. वाढता विरोध आणि आंदोलनाचा इशारा लक्षात घेत अखेर तुषार आपटे यांनी राजीनामा दिला आहे. आपटेंच्या नियुक्तीनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, “लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजपकडून बक्षीस दिलं जात आहे का?” असा सवाल उपस्थित केला होता. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय भाजपसाठी अडचणीचा ठरल्याचे चित्र दिसून आले.

अहिल्यानगरमध्ये अजित पवारांची तोफ धडाडणार; भिस्तबाग चौकात जाहीर सभा

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात तुषार आपटे सहआरोपी असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत होती आणि त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी होत होती. पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात घेत तुषार आपटे यांनी अखेर स्वतःहून राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे, “महोदय, माझी कुळगाव–बदलापूर नगरपरिषद स्वीकृत/नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.”

follow us