निवडणुक अर्जावर छत्रपती संभाजीनगर नाही ‘औरंगाबाद’च नाव; अर्ज वैध, मंत्र्यांचा आक्षेप
औरंगाबाद लिहूनही अर्ज वैध ठरण्यावर सत्ताधाऱ्याने आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे संजय शिरसाठ यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावर (Election) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे गेली 30 वर्ष राजकारण झालं. काही महिन्यांपूर्वी शहराचं नाव अधिकृत छत्रपती संभाजीनगर झालं. तरी देखील लोकसभा आणि विधानसभा औरंगाबाद नावावरच लढल्या गेल्या. सध्या होत असलेली महापालिकेची निवडणूक देखील छत्रपती संभाजीनगर या नावाने होते आहे. परंतु काही उमेदवारांनी औरंगाबाद असं नाव लिहलं आहे.
प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष निवडणूक लढत असलेले सौदागर मोहम्मद शबुद्दीन यांनी शहराच्या नावाच्या रकान्यासमोर शहराचे जुने नाव म्हणजे औरंगाबाद लिहले. नियमानं हा अर्ज बाद होणं, गरजेचं होतं. मात्र, तसं झालं नाही. अर्ज वैध धरण्यात आला. त्यांना चिन्हही मिळालं आणि आता ते शहरात प्रचारही करत आहेत. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की शहराचं जुनं नाव लिहूनही अर्ज वैध ठरवण्यात आला. तो बाद का केला गेला नाही? सौदागर मोहम्मद यांनी शहराचं जुनं नाव का लिहिलं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
रविंद्र चव्हाण यांची ‘सायलेंट स्ट्राइक’खेळी; ठाण्यात भाजपला मजबूत करणारी खेळी
औरंगाबाद लिहूनही अर्ज वैध ठरण्यावर सत्ताधाऱ्याने आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे संजय शिरसाठ यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मंत्री अतुल सावे यांनी देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यानी देखील नुकत्याच आपल्या भाषणात बोलताना म्हटलं होतं कि, छत्रपती संभाजीनगरचा महापौर पहिल्यांदा आपण निवडणार आहोत, यापूर्वी औरंगाबादचा महापौर होता असंही ते म्हणाले. गुलामगिरीचा इतिहास मिटवला पाहिजे, औरंगजेब हा काही भारतीय नव्हता, भारतीय मुसलमानचा देखील तो आयकॉन नव्हता.
मंदिर पाडणे, कर लादणे असे काम त्याने केले. त्यामुळे त्याचं नाव ठेवण्याची गरज नाही. आता मराठ्यांना संपवून जाईल असे समजून तो आला होता, पण त्याची कबर इथे झाली, पण मराठा साम्राज्य संपले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतिहासाने संभाजीराजे यांच्यावर अन्याय केला, कारण इतिहास मोगलांनी लिहला आहे. 9 वर्षे औरंगजेबला झुंजवत संभाजीराजे यांनी ठेवले. आता एक चित्रपट आल्यावर संभाजीराजे यांचे इतिहास सर्वाना माहीत झाला, पण आणखी इतिहास मोठा असल्याचेही ते म्हणाले.
